मर्जीतल्या ठेकेदारांनीच सरकारला लावला चुना, गोरेगाव चित्रनगरीतील स्टुडिओंना दुरुस्तीनंतर चार महिन्यांतच गळती

कमिशनसाठी महायुती सरकार मर्जीतल्या ठेकेदारांनाच कामे देत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीतील स्टुडिओंची डागडुजी करण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले गेले. दुरुस्तीनंतर गेल्या फेब्रुवारीत मराठी भाषा दिनी स्टुडिओंचे उद्घाटन केले गेले. परंतु चार महिन्यांतच त्यांना गळती लागली असून संपूर्ण स्टुडिओंमध्ये पाणी साचल्याने चित्रीकरण करणे कठीण होऊन बसले आहे. ठेकेदारांनी जुने पत्रेच रंग लावून पुन्हा छतावर लावल्याने ही गळती झाल्याचे समोर आले आहे.

गोरेगाव चित्रनगरीतील 8, 9, 10, 11 आणि 12 नंबरच्या स्टुडिओच्या देखभाल, दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम प्रिंटेरियर या ठेकेदार पंपनीकडून करून घेतले गेले. बांधकाम विभागातील उपअभियंता (स्थापत्य) विजय बापट यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी ठेकेदाराकडून कामे करून घेतली, परंतु ती शासनाच्या मापदंडांप्रमाणे झालेली नाहीत. अंदाजपत्रकातील तरतुदींना त्यात डावलण्यात आले. या गलथानपणामुळेच छताला गळती लागली आहे.

गैरकारभाराची चौकशी करा

यासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोव्रेटिक) पक्षाचे सरचिटणीस विशाल नावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. गळतीसंदर्भातील पह्टो आणि व्हिडीओही त्यांनी काढले आहेत. या गलथानपणाची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱयांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.