एप्रिलमध्ये ईपीएफओची खाती 19 लाखांनी वाढली

epfo-pic

ईपीएफओ अर्थात भविष्य निर्वाह निधीच्या खात्यांमध्ये एप्रिलपर्यंत तब्बल 19.14 लाख खात्यांची भर पडली आहे. मनुष्यबळ मंत्रालयाने आज जारी केलेल्या अहवालांतर्गत ही बाब समोर आली आहे. मार्च 2025 पर्यंत ईपीएफओच्या खात्यांमध्ये 31.31 टक्क्यांची वाढ झाली होती, तर याच महिन्यात 2024 मध्ये ईपीएफओच्या खात्यांमध्ये 1.17 टक्क्यांची वाढ झाली होती. एप्रिल 2025 मध्ये ईपीएफओशी जवळपास 9.49 लाख नवीन सदस्य जोडले गेले. मार्च 2025 मध्ये यात 12.49 टक्क्यांची वाढ झाली. ईपीएफओशी जोडले गेलेले सदस्य 18 ते 25 या वयोगटातील आहेत. दरम्यान महाराष्ट्रात एप्रिल महिन्यापर्यंत ईपीएफओधारकांचा आकडा 21.12 टक्क्यांनी वाढल्याचे मनुष्यबळ मंत्रालयाने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.