शुक्रवारपासून ’जगन्नाथ रथ यात्रा’

jagannath-puri-rath-yatra

ओडिसाच्या पुरीमधील जगप्रसिद्ध ’जगन्नाथ रथ यात्रा’ 27 जून 2025 पासून सुरू होत आहे. या यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भगवान जगन्नाथ, त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो लोक येतात. तीन वेगवेगळे रथ तयार केले जात असून हे सर्व रथ लिंबाच्या लाकडापासून बनवले जातात. जगन्नाथ यांचा रथ 45.6 फूट उंच, बलभद्र यांचा रथ 45 फूट उंच आणि सुभद्रा यांचा रथ 44.6 फूट उंच आहे.