तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरसांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता – संजय राऊत

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचे खुलं समर्थन केलं होतं असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरसांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, भाजपला नौटंकी करण्याची त्यांना नशा आहे. पहलगाम आणि पुलवामात जे झालं त्याचाही त्या लोकांनी राजकारणासाठी उत्सव साजरा केला आहे. आणिबाणीला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. भूतकाळात जे झालं त्याला विसरून पुढे गेलं पाहिजे. संघाचे तेव्हाचे सरसंघचालक परमपूज्य बाळासाहेब देवरस यांनी आणिबाणीला पाठिंबा दिला होता. देवरसांना इंदिरा गांधी यांनी जरूर अटक केली होती, पण तुरुंगातून जो इंदिरा गांधी यांना पत्रव्यवहार केला होत फार इंटरेस्टिंग आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरता तुम्ही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आणिबाणीचे खुलं समर्थन केलं होतं. आमच्या मार्मिक प्रेसवर धाड घालून प्रेस बंद केली होती. तरी आम्ही समर्थन दिलं होतं. आणिबाणी ही शिस्त लावणारी व्यवस्था होती असे संजय राऊत म्हणाले.

फडणवीसांनी महाराष्ट्रा हा चोऱ्य़ा माऱ्यांमध्ये आणि भ्रष्टाचारात पहिला एक नंबर केला आहे. ठेकेदाराकडून किमान 40 टक्के पैसे विधानसभा निवडणुकीआधी उचलले आहेत. आता शक्तीपीठ 20 हजार कोटी रुपायांची मंजूरी मिळाली आहे. त्यापैकी किमान 10 हजार कोटी रुपये ठेकेदारांकडून त्यांना निवडणूकीसाठी मिळणार आहे. या माध्यमातून ते पहिल्या क्रमांकावर जात असतील तर त्यांना लखलाभ. हे सरळमार्गी लोक नाही. हे लोक निवडणुका कशा जिंकतात हे राहुल गांधी यांनी फडणवीसांच्या नागपूर दक्षिण मतदारसंघातील कशा पैशांच्या चोऱ्या होतात हे दाखवलं. यावर निवडणूक आयोगाने उत्तर दिले पाहिजे असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.