
हिंदुस्थानी शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी उसळल्याने गुंतवणूकदारांची अक्षरशः चांदी झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1 हजार अंकांनी उसळून 83,755 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 304 अंकांनी वधारून 25,549 अंकांवर बंद झाला. गुरुवारी शेअर बाजार उसळल्याने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.33 लाख कोटी रुपयांची भर पडली. शेअर बाजार उसळण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी झाल्याचे सांगितले जात आहे. आशियाई बाजार, जपानचा निक्केई आणि चीनचा शांघाय कंपोझिट बाजार उसळला आहे. आज बँकिंग सेक्टर सर्वात जास्त फायद्यात दिसला.