रणदीप हुड्डाने खरेदी केला 5.63 कोटींचा फ्लॅट

बॉलिकूड अभिनेता रणदीप हुड्डाने मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटची किंमत 5.63 कोटी रुपये आहे. या फ्लॅटसाठी 33.78 लाख रुपयांचे स्टॅम्प ड्युटी आणि 30 हजार रुपयांचे नोंदणी शुल्क मोजले आहे. या फ्लॅटचे क्षेत्रफळ 1530 कर्ग फूट इतके आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यात बॉलिवूडमधील अनेकांनी अंधेरीत फ्लॅट खरेदी केला आहे. मुंबईतील अंधेरी येथे अनेकांची पसंती आहे. अंधेरी पश्चिमला लागून एक्सप्रेस हायवे, एसव्ही रोड आणि वर्सेवा अंधेरी घाटकोपर मेट्रो लाईनची कनेक्टिव्हिटी आहे.