
शकिरा इसाबेल या कोलंबियन गायिकेचे संगीतप्रेमींच्या मनावरील गारुड आजही कायम आहे. हिंदुस्थानात ‘वाका वाका’ गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या शकिराच्या गाण्यावर अनेक लोक आजही थिरकतात. तिच्या गाण्यावरील नृत्याचे अनेक व्हिडीओ व रील्स व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात पुन्हा ‘शकिरा फिव्हर’ दिसत आहे. तरुण मुले-मुली सोडाच, शिक्षिकाही शकिराच्या गाण्यांवर ठेका धरताना दिसत आहेत. अशाच एका शिक्षिकेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला लाखो ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. @arpita_lucky या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ तुम्हीही पाहू शकता.