हे करून पहा – फ्रिजमध्ये ठेवलेले दही आंबट झाले

दही आंबट झाले की, ते एकतर टाकावे लागते किंवा मग त्याची आपण कढी करतो. इतर काही पदार्थ करतो. मात्र यावर अगदी सोपा उपाय आहे, ज्यामुळे दह्याचा आंबटपणा कमी करता येतो.

आंबट झालेले दही अलगद फ्रिजमधून काढा. त्याच्यावरील सायीचा जाड भाग काढून टाका. वरचा एक थर काढा तो वापरू नका. नंतर दह्यामध्ये पाणी ओता. ते अजिबात डिवचू नका. जरा वरतून पाणी ओता.

भांडं हातात घेऊन जरा हलवा ते पाणी काढून टाका. नंतर पुन्हा दोन ते तीन वेळा असेच करा. नंतर एकदा पाणी घ्या आणि दह्यातून हलकासा चमचा फिरवा आणि ते पाणी पटकन ओतून टाका. आंबटपणा कमी होतो.