मराठीद्वेष्ट्या निशिकांत दुबेंचा मुंबईत आलिशान फ्लॅट! उमेदीच्या काळात मुंबईनेच तारले

महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल गरळ ओकणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना मुंबईनेच मोठे केले आहे. खासदार होण्यापूर्वी हे दुबे महाशय मुंबईत एका कॉर्पोरेट पंपनीत संचालक पदावर काम करत होते. एवढेच नाहीतर मुंबईमध्ये त्यांच्या मालकीचा दोन हजार स्क्वेअर फुटांचा आलिशान फ्लॅटही आहे!

महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल एवढा आकस बाळगणारे निशिकांत दुबे यांना उमेदीच्या काळात मुंबईनेच तारले. खासदार होण्यापूर्वी दुबे हे 1993 ते 2009 या काळात मुंबईतील एका कॉर्पोरेट कंपनीत संचालक पदावर कार्यरत होते. खार वेस्टसारख्या उच्चभ्रू भागातील झुलेलाल अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर दुबे यांचा 1680 स्वेअर फुटांचा फ्लॅट असून याची नोंद त्यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात केलेली आहे. सध्या हा फ्लॅट भाडय़ाने दिलेला असून बाजारभावाप्रमाणे या फ्लॅटची किंमत तीन कोटींच्या पुढे असल्याचे सांगण्यात येते.

अजूनही मग्रुरी कायम
निशिकांत दुबे यांनी आता देशाच्या विकासातील महाराष्ट्राचे योगदान मान्य केले. आज त्यांचा सूरही बराच खाली उतरला होता. मात्र पटक पटक के मारेंगे या विधानावर आपण अजूनही कायम असल्याची त्यांची मग्रुरी कायम होती.