
पोटातून कोकेनची तस्करी करणाऱ्या महिलेला महसूल गुप्तवार्ता संचालनालय (डीआरआय) ने अटक केली. फ्लोरेन्स अविनो इडनगसी असे तिचे नाव असून ती नैरोबी येथून आली होती. तिच्या पोटातून 6 कोकेन असलेल्या कॅप्सूल बाहेर काढल्या. जप्त केलेल्या कोकेनची किंमत सुमारे साडेसहा कोटी रुपये इतकी आहे. एनडीपीएस कायद्यानुसार तिला अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आले.