धोक्याचा इशारा देऊनही ड्रीमलायनर उडाले, विमानाचा तोल सांगणाऱ्या सेन्सरमध्ये होता बिघाड; एएआयबीच्या प्राथमिक अहवालातून उघड

विमानाचा तोल सांगणाऱ्या सेन्सरमध्ये बिघाड झाला होता. याबाबत वैमानिकाने धोक्याचा इशारा देऊनही सूचनेनुसार ड्रीमलायनर विमान उडाले. वैमानिकाने उड्डाण केले आणि काही सेकंदातच होत्याचे नव्हते झाले, अशी माहिती समोर आली आहे. एएआयबीच्या प्राथमिक अहवालातून ही बाब उघड झाली आहे.

दिल्ली-अहमदाबाद असे उड्डाण करून विमान अहमदाबादला पोहोचले. तिथून लंडनला जाण्याआधी वैमानिकाने ही तांत्रिक सूचना नोंदवली. अवघ्या एका तासात विमानाला पुन्हा उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली. STAB POS XDCR हे आपल्याला विमानाच्या क्षैतिज स्टॅबिलायझरची म्हणजेच पिच बॅलन्स राखणाऱ्या मागील विंगची स्थिती सांगते. जर हा डेटा अचूक असेल तर ऑटोपायलट, पिच कंट्रोल आणि स्टॉल प्रोटेक्शनसारख्या महत्त्वाच्या सिस्टम चुकीच्या आज्ञा देऊ शकतात. विशेषतः टेकऑफ आणि सुरुवातीला उड्डाणासारख्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये चुकीच्या कमांडमुळे अपघात घडू शकतो, अशी माहिती समोर आली आहे.

एएआयबीच्या प्राथमिक अहवालाबाबत सरकार प्रचंड तणावाखाली असल्याचे दिसत आहे. या अहवालाचा अभ्यास सुरू असून लगेचच कोणताही निष्कर्ष काढू नका, असे आवाहन सरकारने केले आहे. अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमान उड्डाणाच्या शेवटच्या क्षणी काय घडले? एअरक्राफ्ट ऑक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने त्यांच्या 15 पानांच्या प्राथमिक अहवालात याचा उल्लेख केला आहे. त्यानुसार दोन्ही वैमानिक अनुभवी आणि उड्डाणासाठी तंदुरुस्त होते. विमानातही तांत्रिक बिघाड नव्हता. काही काळापूर्वी इंजिन बदलण्यात आले होते. तथापि उड्डाणानंतर तीन सेपंदातच इंधन स्विच बंद झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सकाळी 11 वाजून 17 मिनिटांनी दिला इशारा

सकाळी 11 वाजून 17 मिनिटांनी वैमानिकाने तांत्रिक सूचना नोंदवली होती. तरीही अवघ्या एका तासात विमानाला पुन्हा उड्डाणाची परवानगी देण्यात आली. दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. दुपारी 1 वाजून 38 मिनीटांनी दिल्लीहून अहमदाबादला आलेले तेच उड्डाण लंडनसाठी उडाले आणि 30 सेपंदानंतर दोन्ही इंजिन बंद पडली.

अहवालात वैमानिक बळीचा बकरा, एएलपीए संघटना संतापली

एअरक्राप्ट ऑक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या अहवालात अपघाताचे खापर वैमानिकांवर पह्डण्यात आले असून त्यांना बळीचा बकरा बनवला जात आहे, असा आरोप एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडियाने केला असून अपघाताची निष्पक्ष आणि तथ्यांवर आधारित चौकशी करण्याची मागणी केली आहे. एअर इंडिया विमान अपघाताच्या चौकशीची दिशा वैमानिकांच्या चुकीकडे झुकल्याचे दर्शवते, असा आरोपही करण्यात येत आहे.