
सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणीने क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली निवृत्त प्राध्यापकाच्या बँक खात्यावर डल्ला मारला आहे. याप्रकरणी पश्चिम सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार हे निवृत्त प्राध्यापक आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांना फेसबुकवर एका महिलेची रिक्वेस्ट आली. त्यानंतर तिने तक्रारदार यांच्या व्हॉट्सअॅपवर क्रिप्टो गुंतवणुकीबाबत मेसेज केला. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केल्यास कसा नफा मिळतो असे त्यांना सांगितले. त्यांचा विश्वास जिंकून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तिने त्यांना बँक खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितली.