
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कचरा संकलन विभागात कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. काम न करताच आठ महिन्यांचे बिल ठेकेदाराच्या घशात घालण्याचा घाट घातला जात आहे. यामध्ये अधिकारी ठेकेदार असे रॅकेट असल्याचा पर्दाफाश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणीही आयुक्तांकडे केली आहे. पालिकेच्या ड, जे, आय, ई, फ, ग आणि ह या 7 प्रभागांमध्ये दररोजच्च कचरा संकलनासाठी सुमि फॅसिलिटीन एल्कोप्लास्ट इनवायरो सिस्टिम इंडिय आणि सुमित ग्रीन इनवायरो सर्व्हिसेस या कंपन्यांन ठेका देण्यात आला आहे. संबंधित कंपन्यांना 9 ऑगस 2024 रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. मा प्रत्यक्षात कचरा संकलनाचे काम 18 मे 2025 पासूनच सुरू केले. जवळपास 8 ते 9 महिन्यांच्या कालावधीत या कंपन्यांनी कामच न करता त्य कामाचे बिल काढण्यासाठी सत्तेतील एक पक्ष दबाव आणत आहे.
ठेकेदाराच्या दिमतीला पालिकेच्या गाड्या
कचरा संकलनाच्या ठेकेदारांनी टेंडरच्या अटींप्रमाणे स्वतःची यंत्रणा वापरणे बंधनकारक असताना महापालिकेच्या घंटागाड्या, आर. सी. गाड्या, डंपर आणि कामगार यांचाच वापर करून कचरा संकल होत आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक सुधीर बासरे यांनी पालिका आयुक्त अभिनय गोयल यांच्याकडे केली आहे.


























































