इंटेलिजेन्स ब्युरोमध्ये 3700 जागांसाठी भरती

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारितील इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) ने असिस्टेंट सेंट्रल इंटेलिजन्स अधिकारी (एसीआयओ) च्या 7 हजार 717 पदांसाठी भरती आयोजित केली आहे. या पदांसाठी 19 जुलैपासून अर्ज भरता येणार असून 10 ऑगस्ट 2025 अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज भरणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही विषयात पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे असायला हवे. या भरतीची सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट www.mha.gov.in वर देण्यात आली आहे.