
टोमॅटो आपल्या प्रत्येकाच्या घरात काही ना काही पदार्थ करण्यासाठी वापरला जातोच. आपल्या दैनंदिन जीवनात टोमॅटो सूप, टोमॅटो कोशिंबीर किंवा टोमॅटोची भाजी असे नानाविध प्रकार करत असतो. परंतु हाच टोमॅटो केवळ आपल्या जीभेची चव वाढवत नाही. तर टोमॅटो आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा मानला जातो.
शरीर म्हटल्यावर व्याधी या होणार आहेतच. परंतु या व्याधी होण्याआधीच आपण काही काळजी घेतली तर अधिक उत्तम. आपल्या स्वयंपाकघरातील अनेक फळे भाज्या या आपल्या शरीरासाठी पौष्टिक मूल्ये म्हणून गरजेच्या आहेतच. परंतु याच गोष्टी आपल्यासाठी आजारपणातही आणि त्या आधीची काळजी म्हणूनही गरजेच्या आहेत. अशीच एक फळभाजी म्हणजे टोमॅटो. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, ऑरगॅनिक सोडियम, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सल्फरचा चांगला स्रोत आहे. टोमॅटो त्वचेसाठी तसेच आपल्या केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. इतकेच नाही तर, बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर टोमॅटो यामध्ये देखील उपयुक्त आहे.
Red Lentil Benefits – लालचुटूक मसूर डाळ आपल्या आहारात का समाविष्ट करायला हवी, वाचा
टोमॅटोच्या ज्सूस आपण का प्यायला हवा?
टोमॅटोच्या ज्यूसमध्ये तसेच टोमॅटोमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. संशोधनातून असे दिसून आले आहे की टोमॅटोच्या रसात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.
Health Tips – निरोगी राहण्यासाठी रोज सकाळी किमान एक वाटी ‘हे’ खायलाच हवे, वाचा
टोमॅटोमध्ये ‘लाइकोपीन’ हा घटक असतो. हे एक विशेष अँटिऑक्सिडंट आहे, जे अल्फा कॅरोटीन, बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ई पेक्षा जास्त शक्तिशाली मानले जाते. ते कर्करोग रोखण्यास मदत करते.
टोमॅटोमध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम हाडांच्या ऊतींच्या दुरुस्तीस मदत करतात. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम असते. ते हाडे मजबूत करण्यास मदत करते. टोमॅटोचा रस प्यायल्याने शरीरातील लायकोपीनची कमतरता दूर होते, ज्यामुळे हाडांवर ताण कमी होतो.
आम्लता आणि गॅसपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुमच्या आहारात टोमॅटो किंवा त्याचा रस समाविष्ट करा. टोमॅटोमध्ये भरपूर कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन सी असते. ते पोटातील वायू आणि आम्लता दूर करण्यास मदत करते. त्यात असलेले क्लोरीन आणि सल्फर पोटातील वायूची तक्रार दूर ठेवतात.
टोमॅटोचा ज्यूस आपल्या त्वचेसाठी अतिशय उपयुक्त मानला जातो. यामुळे अकाली येणारे वृद्धत्व कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे आपल्या त्वचेला अनोखा तजेलाही प्राप्त होतो.