असं झालं तर – रेल्वे प्रवासात विनातिकीट पकडले तर…

  1. मुंबईत लोकलने प्रवास करताना अनेकदा तिकीट काढायला वेळ मिळत नाही. त्यामुळे काही जण विनातिकीट प्रवास करतात.
  2. जर तुम्हाला विनातिकीट लोकल प्रवास करताना टीसीने पकडले, तर तुम्हाला नियमानुसार दंड भरावा लागू शकतो.
  3. रेल्वेच्या कायद्यानुसार, विनातिकीट प्रवास करणे गुन्हा आहे. तुम्ही कुठून कुठपर्यंत प्रवास केला यावर दंड आकारला जातो.
  4. तुमच्याकडे दंड भरण्यासाठी पैसे नसतील तर तुम्हाला सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
  5. विनातिकीट प्रवास केल्यास गुपचूप दंड भरा अन्यथा तुम्हाला कोर्टात हजर केले जाईल. विनातिकीट प्रवास करणे टाळावे.