
गणेशोत्सवात मुंबई, ठाणे परिसरातून लाखो गणेशभक्त कोकणातील गावी जातात. या चाकरमान्यांच्या सोयीसाठी दिवा-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनची सेवा लवकरात लवकर दादर रेल्वे स्थानकातून सुरू करा, अशी आग्रही मागणी शिवसेनेने मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. गणपती सणापूर्वी ही ट्रेन दादर रेल्वे स्थानकातून न सोडल्यास कोकणवासीयांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेने मध्य रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
दिवा-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन लवकरात लवकर दादर स्थानकातून सुरू करण्याची आग्रही मागणीही शिवसेनेने केली आहे. यावेळी शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते- माजी खासदार विनायक राऊत, रेल कामगार सेनेचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते विनायक राऊत, सरचिटणीस दिवाकर देव (बाबी), कार्याध्यक्ष संजय जोशी, नरेश बुरघाटे, सुरेश परदेशी, चंद्रकांत विनरकर, तुकाराम कोरडे, योगेश जाधव, किशोर सोनावणे, प्रशांत कमाणकर, डॉ. जनार्दन देशपांडे, नीलेश कदम, प्रतीक गायकर, योगेश भोईर, सुनील आघाव आदी पदाधिकारी उपस्थित होते.