
जगदंब हायस्कूल माहूरच्या 1989 च्या माजी विद्यार्थी तब्बल 46 वर्षानंतर एकत्र आले. सोशल मीडियाच्या मदतीने सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्याने सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण होते. अगदी उत्साहात, एकमेकांची विचारपूस करत स्नेहमिलन मेळावा आनंददायी वातावरणात पार पडला.
माहूरच्या जगदंब हायस्कूल येथे 1978-79 या वर्षात शिकत असलेले माजी विद्यार्थी सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांना शोधत होते. त्यांच्या शोधकाऱ्याला यश आलं आणि तब्बल 46 वर्षानंतर हे सर्व विद्यार्थी एकत्र आले. प्रामुख्याने राजश्री फलटणकर यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, माजी विद्यार्थी प्रकाश जगत आणि संजय रामकृष्णराव कुलकर्णी यांनी निर्माण केलेली सकारात्मक उर्जा आणि सर्वांना एकत्र करण्याची नियोजनबद्धता यामुळे तब्बल 46 वर्षानंतर हे माजी विद्यार्थी एकत्र आले. सुधीर देव यांचे उत्कृष्ट नियोजन तसेच किरण तळेगावकर आणि विजय भोपी यांच्या सहकार्याने हे स्नेहमिलन पार पडले. इतक्या वर्षानंतर हे सर्व मित्र एकत्र आल्याने सर्वांच्या चेहर्यावर आनंदाश्रू दिसून येत होते. शंकर राठोड, प्रदीप कान्नव, विजय कोरडकर, भारत बेहेरे, राजेंद्र देशमुख, जगदीश पांडे, सिमा देशमुख, मंगल देशपांडे, हिमांचल जोशी, लता कान्नव, सुनिता कान्नव, दया पांडे, बेबी तुंडलवार, लता कपाटे, विमल पवार आदी अनेक माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते.



























































