India Tour Of England – वनडे आणि टी-20 मध्ये टीम इंडिया इंग्लंडला पाणी पाजणार! BCCI ने जारी केलं वेळापत्रक

हिंदुस्थानचा इंग्लंड दौरा सुरू असून पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या खेळली जात आहे. इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. सध्या चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये खेळला जात आहे. याच दरम्यान BCCI ने टीम इंडियाच्या पुढील वर्षी होणाऱ्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. टीम इंडिया या दौऱ्यामध्ये इंग्लंडविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळणार आहे.

टीम इंडियाचा इंग्लंड दौरा 1 जुलै पासून सुरू होणार आहे. तर 19 जुलै रोजी टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यातील आपला शेवटचा सामना खेळेल. BCCI ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये प्रथम पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल आणि त्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. पहिला टी-20 सामना 1 जुलै रोजी डरहम येथे, दुसरा टी-20 सामना 4 जुलै रोजी मँचेस्टर, तिसरा टी-20 सामना 7 जुलै रोजी नॉटिंघम आणि पाचवा टी-20 सामना 11 जुलै रोजी साउथहॅम्प्टन येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर वनडे मालिकेला सुरुवात होईल. पहिली वनडे 14 जुलै रोजी बर्मिंघम, दुसरी वनडे 16 जुलै रोजी कार्डिफ आणि तिसरी वनडे 19 जुलै रोजी लंडनमध्ये खेळली जाणार आहे.