राजीनामा नाही तर, खांदेपालट; कृषी खाते भरणेंकडे, तर कोकाटेंकडे क्रीडा?

विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा घेतील अशी चर्चा होती. मात्र तसं न होता राजीनाम्यावर आले ते केवळ तंबीवर निभावले. मात्र असता अशी बातमी समोर येत आहे की, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून ते दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवले जाऊस शकते. ‘एबीपी माझा’ने सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिलं.

दरम्यान, विधिमंडळात ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आणि शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्यांमुळे कोकाटे वादात सापडले होते. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात कोकाटे यांच्या भवितव्याबाबत चर्चा झाली असून, लवकरच अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, दत्तात्रय भरणे यांना कृषी खात्याची जबाबदारी देऊन पक्ष आणि सरकारची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न होत असल्याचे एबीपी माझाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.