
‘सैयारा’ या चित्रपटाने जगभरात जबरदस्त कमाई केली आहे. 18 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सैयारा’ने अवघ्या 13 दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई करत वर्ल्डवाईड 400 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा या नव्या जोडीने ‘सैयारा’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये जोरदार पदार्पण केले आहे. या चित्रपटाने तरुणाईला भुरळ घातली आहे.