Health Tips – फक्त थेंबभर ‘या’ तेलामुळे तुम्हाला मिळतील आरोग्यवर्धक फायदे

आपल्याकडे अनेक प्रकारचे गरम मसाले आपण आहारात वापरतो. त्या प्रत्येक गरम मसाल्याचा आपल्या आरोग्यासाठी विविध प्रकारे उपयोग होत असतो. त्यातलीच एक महत्त्वाचा गरम मसाला म्हणजे लवंग. लवंग ही दिसायला छोटी असली तरीही, तिचे महत्त्व हे फार बहुमोली आहे. लवंगेचा उपयोग अनेक छोट्या मोठ्या दुखण्यावर केला जातो. आरोग्याच्या समस्येवर मात करण्यासाठी, लवंग खूप बहुमोली आहे. आर्युर्वेदामध्ये लवंगेचा वापर हा प्रामुख्याने दुखण्यावर केला जातो. त्यामुळेच लवंग ही दाढदुखीसाठी सुद्धा वापरली जाण्याची प्रथा ही फार पूर्वापासून आहे. आरोग्याच्या अनेक समस्यांवर लवंग खूप उपयुक्त आहे.

Health Tips – शरीर निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ व्हिटॅमिन्स आहेत खूपच गरजेची, वाचा

लवंग तेलाचेही अनेक आरोग्यवर्धक फायदे आहेत. खासकरून ज्यांची त्वचा कोरडी आहे अशांनी लवंग तेल वापरणे हे फार हिताचे मानले जाते. कोरड्या त्वचेच्या लोकांसाठी लवंग चे तेल हे एक उत्तम नैसर्गिक उपाय मानला जातो. लवंग तेल विशेषतः स्ट्रेच मार्क्स, सूज आणि त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी वापरले जाते.

Health Tips – शरीर निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ व्हिटॅमिन्स आहेत खूपच गरजेची, वाचा

जाणून घेऊया लवंग तेलाचे आरोग्यवर्धक फायदे

लवंग तेल हे केसांसाठी सुद्धा खूप उत्तम आहे, त्यामुळे केसगळती रोखण्यासाठी लवंग तेल हे महत्त्वाचे आहे.

लवंग तेल आणि तिळाचे तेल मिक्स करून केसांना लावल्याने, केस गळती कमी होते. तसेच केसांना चकाकी सुद्धा प्राप्त होते.

दात दुखल्यावर आता त्या ठिकाणी लवंग ठेवण्यापेक्षा लवंग तेल लावणे केव्हाही सोयिस्कर आहे. त्यामुळे दातदुखीपासून नक्कीच आराम मिळेल.

लवंग तेलाचा उपयोग आर्थरायटिस, डोकेदुखी इत्यादी समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आपण करू शकतो.

त्वचेवरील खाज आणि जळजळ कमी करण्यासाठी लवंग तेल वापरले जाते.

दाढदुखीच्या वेदनेवर लवंग हा जालिम इलाज मानला जातो. अनेकदा दाढ दुखल्यावर, लवंग दाढेमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

लवंग ही डोकेदुखीवर पण वापरण्याचा सल्ला दिला जातो. लवंगेचे तेल हे डोकेदुखीवर जालीम इलाज आहे. लवंगेच्या तेलातील दाहक गुणधर्म डोकेदुखीचा समूळ नाश करतात.

आपले डोके ठणकत असेल तर, लवंगेमुळे ही ठणकही कमी होते. तसेच लवंग तेल आपल्या गुडघ्यांसाठी सुद्धा खूप उपयुक्त मानले जाते.

गुडघेदुखीची समस्या असणारे बरेचदा लवंग तेल आणि खोबरेल तेल एकत्र करून गुडघ्यांना लावतात. त्यामुळे गुडघेदुखीचे प्रमाण अंशतः कमी होते.

खोबरेल तेलामध्ये लवंग तेल मिसळून त्यात थोडे मीठ घालावे. हे मिश्रण दुखणाऱ्या भागावर चोळल्यास दुखणे कमी होण्यास मदत होते.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)