गडकरी यांनी नेहरू-गांधी यांचे योगदान मान्य केले असेल तर त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या समजदारीला सलाम – संजय राऊत

भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना नेहरु आणि गांधींबद्दर प्रंचड द्वेष आहे. त्यांचा हा द्वेष अनेकदा दिसून आला आहे. एवढा टोकाचा द्वेष असणारे राज्याकर्ते देशाला मिळाले आहेत, हे देशाचे दुर्दैव आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजप आणि सरकारमध्ये सर्वात समजूतदार मंत्री नितीन गडकरी हेच आहेत. त्यांनी नेहरू- गांधी यांचे देशाच्या विकासातील योगदान मान्य केले असेल तर त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या समजूतदारपणाला सलाम असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गंधी यांचे नाव घेत केंद्रीय मंत्री देशाच्या जडणघडणीबाबत आणि देशातील त्यांच्या योगदानाबाबत काही बोलले असतील, तर त्यात चुकीचे काय आहे. भाजपमध्ये आणि सरकारमध्ये सध्या सर्वात समजदार मंत्री कोण असेल तर ते नितीन गडकरी हेच आहेत. गडकरी यांनी नेहरुंचे नाव घेत त्यांचे कौतुक केले म्हणून त्यांच्यावर कारवाई तर होणार नाही ना, अशी शंका आपल्याला येत आहे, असेही ते म्हणाले.

सरकारला नेहरूंबाबात प्रंचड द्वेष आहे. मुंबईतील एक मेट्रो स्थानला सायन्स सेंटर, विज्ञान केंद्र असे नाव देण्यात आले. पण ते नेहरू सायन्स सेंटर आहे. यातून त्यांनी नेहरू हे नाव काढले, एवढे द्वेष त्यांना आहे. एवडा द्वेष कोणाला असेल तर ते राज्य करण्यास योग्य नाही. तसेच बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या नावाने प्रसिद्ध आहे. मात्र, तेथील मेट्रो स्थानकाला फक्त राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले आहे. एवढा द्वेष असलेले राज्यकर्ते असणे हे देशाचे दुर्दैव आहे. त्यामुळे गडकरी यांनी नेहरू-गांधी यांचे योगदान मान्य केले असेल तर त्यांचे अभइनंदन करतो आणि त्यांच्या समजदारीला सलाम करतो, असेही संजय राऊत म्हणाले.

56 इंची छाती असलेले पंतप्रधान ट्रम्पला का घाबरतात?
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एवढे का घाबरतात तेच कळत नाही. हिंदुस्थान रशियाला युक्रेन विरोधात युद्धासाठी आर्थिक मदत करत आहे, हा ट्रम्प यांचा दावा हास्यास्पद आहे. यावरून ट्रम्प यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे, असे वाटते. त्यामुळे याबाबत मोदी यांनी त्यांना समज देणे गरजेचे आहे. मात्र, अद्याप मोदी यांनी ट्रम्प यांच्याबाबत एक अक्षरही काढले नाही. 56 इंची छाती असलेले मोदी ट्रम्प यांना का घाबरतात, असा प्रश्न जनतेला पडला आहे, असेही ते म्हणाले