
पुण्यातील नांदेड सिटीत ड्रेनेज लाईनचे काम सुरू असताना खणलेल्या मोठ्या खड्ड्यात काम करणाऱ्या कामगारांवर मातीचा मोठा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत तीन कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. यातील एकाला अग्निशमन दल व बचाव पथकाने बाहेर काढले आहे. तर इतर दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या घटनास्थळी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दल तसेच पीडीआरएफ संयुक्तरित्या बचावकार्य करत आहेत.
ड्रेनेज लाईनच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला, तीन कामगार अडकले pic.twitter.com/Wt3IBHJicT
— Saamana Online (@SaamanaOnline) August 4, 2025
नांदेड सिटी कंपाऊंड वॉलच्या बाहेरील बाजूस ही घटना घडली असून याठिकाणी महापालिकेच्या ड्रेनेज लाईनचे काम सुरू होते.