
एचसीएल टेकचे सी. विजयकुमार हे हिंदुस्थानी आयटी उद्योगातील सर्वाधिक पगार घेणारे सीईओ ठरले आहेत. त्यांना 2024-25 या आर्थिक वर्षात 94.6 कोटी रुपये पगार देण्यात आला. त्यांचा पगार सरासरी कर्मचाऱयांपेक्षा 663 पट जास्त आहे, तर दुसऱया नंबरवर इन्पहसिसचे सीईओ सलील पारेख हे आहेत. त्यांना 80.6 कोटी रुपये वार्षिक पगार देण्यात आला आहे.