डोळ्यात कचरा गेला तर…

yoga-for-eyes
1>> डोळ्यांना हाताने ऊब द्या! मांडी घालून जरा शांत बसा. डोळे बंद ठेवा. काही वेळानंतर हाताचे तळवे एकमेकांवर घासून त्याची ऊब डोळ्यांना द्या. दिवसातून कितीही वेळा ही क्रिया तुम्ही करु शकता. तुम्हाला नक्की फ्रेश वाटेल.

 डोळ्यात कचरा गेला असेल तर डोळा चोळू नका. त्याऐवजी डोळ्यावर हलक्या पद्धतीने भरपूर पाणी मारा. डोळ्यातील कचरा बाहेर काढण्यासाठी डोळा धुवा. एका मोठय़ा टपात पाणी टाकून तोंड त्यात बुडवा, डोळे पाण्यात फिरवा यामुळे डोळ्यातील कचरा निघून जाईल. कापसाचा बोळा पाण्याने ओला करून डोळ्याच्या कडेला हलक्या हाताने फिरवा.

 जर कचरा पापणीच्या खाली अडकला असेल तर पापणी वर करून पाण्याने धुवा. डोळ्यातील कचरा काढताना जोर लावून काढू नका. यामुळे डोळ्याला इजा होऊ शकते. डोळ्यातून सतत पाणी येत असेल आणि डोळा लालसर होऊन डोळ्याला वेदना होत असतील तर तत्काळ डॉक्टरांकडे जा.
असं झालं तर…