
‘‘चीनने हिंदुस्थानची 2 हजार वर्ग चौरस किलोमीटर जमीन हडपली हे तुम्हाला कसे कळले? तुम्ही तिथे गेला होतात का? तुमच्याकडे याचा पुरावा आहे का?’’ असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केला.
‘‘चीनने आपला भूभाग बळकावला आहे. आपले 20 जवान मारले गेले, असा दावा राहुल यांनी ‘भारत जोडो’ यात्रेच्या दरम्यान केला होता. त्यावरून त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. सर्वोच्च न्यायालयाने आज राहुल यांच्या विरोधातील ही याचिका फेटाळली.