
इंग्लिश वेगवान गोलंदाज ख्रिस व्होक्स खांदा निखळल्यामुळे पहिल्या डावातच सामन्याबाहेर फेकला गेला होता. तो पहिल्या डावात फलंदाजीलाही आला नव्हता आणि दुसऱया डावात गोलंदाजीलाही उतरला नाही. मात्र इंग्लडने नववी विकेट गमावल्यानंतर तो स्वेटरमध्ये हात बांधून फलंदाजीला आला. त्याला एका हाताने फलंदाजी करणे शक्य नव्हते, तरी तो मैदानात अॅटकिन्सनला साथ देण्यासाठी उतरला. तो डाव्या हाताने फलंदाजी करणार होता. तो मैदानात उतरला तेव्हा उपस्थितांनी टाळय़ांच्या गजरात त्याचे स्वागत केले. पण अॅटकिन्सनने चतुराईने खेळ करत व्होक्सला फलंदाजीची संधीच येऊ दिली नाही. मँचेस्टर कसोटीत ऋषभ पंतही पायाला झालेल्या फ्रॅक्चरनंतरही मैदानात उतरला होता.