लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ‘बाप्यां’ना नोटीस, एका महिन्यात पैसे परत न केल्यास फौजदारी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही गरीब व गरजू महिलांसाठी असतानाही 14 हजारांपेक्षा जास्त पुरुषांनीही त्या योजनेचे पैसे घेतल्याचे नुकतेच उघड झाले होते. या पुरुषांकडून आता ते पैसे वसूल केले जाणार आहेत. त्यासाठी त्यांना सरकारकडून नोटीस बजावण्यात आली असून एका महिन्यात पैसे परत न केल्यास फौजदारी कारवाईचा इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. आतापर्यंत 21 कोटी 44 लाख रुपये इतकी ही रक्कम आहे.