
बिग बॉस हिंदी चे 19 वे पर्वलवकरच सुरू होणार आहे. यंदा कोण कोणते स्पर्धक दिसणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. बिग बॉस कायम घरात काही ना काही ट्विस्ट आणत असतात. यंदाही त्यांनी एक अशा सेलिब्रिटींना हा शो ऑफर केला आहे जे तब्बल आठ वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. मात्र आता दहा वर्षानंतर ते बिग बॉसच्या घरात दिसण्याची शक्यता आहे.
दिव्यांका त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा या दोघांचे बनू में तेरी दुल्हन या मालिकेच्या सेटवर सूत जुळले होते. मालिका सुरू होती तोपर्यंत हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र 2015 मध्ये दिव्यांकाचे शरदसोबत ब्रेकअप झाले. तसेच शरद व तिचे नातेसंबंध वाईट वळणावर संपले होते. त्यामुळे या ब्रेकअपनंतर दिव्यांका डिप्रेशनमध्येही होती असे बोलले जाते. त्यानंतर काही वर्षांनी दिव्याने विवेक दहिया याच्यासोबत लग्न केले तर शरद देखील लग्नबंधनात अडकला.
ब्रेकअपनंतर दहा वर्षांनी दिव्यांका व शरदला बिग बॉसकडून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विचारणा करण्यात आली आहे. दिव्यांकाला या आधीच्या काही सिझनमध्येगी विचारणा करण्यात आलेली होती. मात्र तिने नकार दिलेला होता.आता यंदा ती होकार देते की यंदाही नकार कळवते ते वेळच सांगेल.