
कॉमेडियन कपिल शर्मा याच्या कॅनडातील कॅप्स कॅफेवर गुरुवारी दुपारी गोळीबार करण्यात आला. गेल्या महिनाभरातला हा दुसरा गोळीबार आहे.
या गोळीबाराची जबाबदारी गँगस्टर गोल्डी ढिल्लोने घेतली आहे. गोल्डी ढिल्लो हा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आहेत. सोशल मीडियावर व्हाय़रल झालेल्या एक पोस्टमधून हा गोळीबार गोल्डीने केल्याची माहिती देण्यात आली आहे.
‘जय श्री राम. सत श्री अकाल राम राम. कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर आज झालेल्या गोळीबाराची जबाबदारी गोल्डी ढिल्लोने घेतली आहे. तो लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आहे. आम्ही कपिल शर्माला कॉल केला होती. मात्र त्याने आमचा कॉल उचलला नाही. जर त्याने उत्तर दिले नाही तर आमची पुढची कारवाई मुंबईमध्ये असेल’, असे त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
याआधी 9 जुलै रोजी देखील कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर गोळीबार झाला होता. त्यावेळी खलिस्तानी दहशतवादी हरजित सिंग लड्डी यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली.