
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी इंडिया आघाडीची नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. तसेच या बैठकीच्या वेळी देशातील राजकीय क्षेत्रात असलेली नारी शक्तीही दिसून आली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि सौ. रश्मी ठाकरे वहिनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सौ. सुप्रिया सुळे, डीएमके नेत्या कनिमोळी, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची विशेष उपस्थिती होती.