
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेसाठी अमेरिकेने 50 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच तब्बल 418 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ट्रम्प प्रशासनाने मादुरो यांच्यावर जगातील सर्वात मोठया नाकाx-तस्करांपैकी एक असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्यावर अमेरिकेत फेंटानिल-मिश्रित कोकेनची तस्करी करण्यासाठी ड्रग कार्टेलसोबत काम केल्याचा आरोप आहे.
न्यायविभागाने मादुरो यांच्याशी संबंधित तब्बल 700 दशलक्षहून अधिक संपत्ती जप्त केली आहे. यात दोन खासगी जेट विमानांचा समावेश असल्याची माहिती अॅटर्नी जनरल पाम बोंडी यांनी दिली. 2020 मध्ये मॅनहॅटनच्या एका फेडरल कोर्टात मादुरो यांच्यावर नाकाx- तस्करी दहशतवाद आणि कोकेन तस्करीचे आरोप ठेवण्यात आले होते. त्यावेळी ट्रम्प प्रशासनाने त्यांच्या अटकेसाठी 15 दशलक्ष डॉलर्सचे बक्षिस ठेवले होते. त्यानंतर बायडेन प्रशासनाने त्यात वाढ करून ते 25 दशलक्ष डॉलर्स केले. ‘9/11’ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने ओसामा बिन लादेनच्या अटकेसाठी हेच बक्षीस ठेवले होते. आता ट्रम्प प्रशासनाने त्यात आणखी वाढ करून ते 50 दशलक्ष डॉलर्सपर्यंत नेले आहे. दरम्यान, 2013 पासून व्हेनेझुएलामध्ये मादुरो सत्तेत आहेत.