ट्रम्प यांची पुन्हा मांडवली, अझरबैजान-आर्मेनियात शांतता करार

टॅरिफच्या घोषणा जागतिक व्यापार विश्वात खळबळ उडवून देणारे डोनाल्ड ट्रम्प हे दुसरीकडे शांतिदूत बनून वेगवेगळ्या देशांत मांडवली घडवून आणत आहेत. ट्रम्प यांच्या उपस्थितीत आज अझरबैजान आणि आर्मेनिया या दोन देशांनी शांतता व व्यापारी करारावर स्वाक्ष्रया केल्या.

अझरबैजान आणि आर्मेनियामध्ये एका प्रदेशावरून गेल्या 37 वर्षांपासून वाद आहे. वादग्रस्त प्रदेशाला व्यापारी कॉरिडॉर बनवून ट्रम्प यांनी हा वाद मिटवला. या कॉरिडॉरला ’ट्रम्प रूट फॉर इंटरनॅशनल पीस अँड प्रॉस्पेरिटी’ असे नावही देण्यात आले. या दोन्ही देशांनी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याचीही मागणी केली.