अलास्कामध्ये ट्रम्प-पुतीन भेट होणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची  भेट 15 ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये होणार आहे. या भेटीत युव्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या समाप्तीबाबत चर्चा करतील. जर या दोन्ही नेत्यांमधील ही बैठक यशस्वी झाली तर 3 वर्षांपासून सुरू असलेले युव्रेन युद्ध संपू शकते.

 जर ट्रम्प आणि पुतीन भेटले तर अमेरिकेच्या भूमीवर दोन्ही नेत्यांची भेट होण्याची ही पहिलीच वेळ असेल. रशियाने यापूर्वी पुतीन आणि ट्रम्प यांच्या भेटीसाठी यूएईची शिफारस केली होती. तथापि, नंतर ट्रम्प यांनी भेटीसाठी अलास्काची निवड केली.

 अलास्का रशियापासून फक्त 88 किलोमीटर अंतरावर आहे. पुतीन यांना येथे भेटणे अधिक सोयीचे असू शकते.

 अलास्कापासून जवळचे रशियन लष्करी तळ सुमारे 80 ते 100 किलोमीटर अंतरावर आहे. हे तळ रशियाच्या चुक्चा स्वायत्त प्रदेशात आहे, जे बेरिंग सामुद्रधुनीच्या पलीकडे आहे.

 या प्रदेशात रशियाचे काही हवाई दलाचे तळ आणि लष्करी देखरेख पेंद्रे आहेत, ज्यात अण्वस्त्रsदेखील असू शकतात.