
रेल्वेच्या आयआरसीटीसीने मुंबईकरांसाठी जपानचे आकर्षक टूर पॅकेज जाहीर केले आहे. जपान अल्पाईन वंडर्स अँड हेरिटेज या विशेष दौऱ्याची सुरुवात 5 ऑक्टोबर 2025 पासून मुंबईतून होणार आहे. दहा दिवसांच्या प्रवासात प्रवाशांना जपानच्या समृद्ध सांस्कृतिक आणि निसर्गवैभवाचा आनंद घेता येईल. पॅकेजमध्ये मुंबई-टोकियो-मुंबई प्रवासासाठी राऊंड – ट्रिप आंतरराष्ट्रीय उड्डाण, हॉटेलमध्ये निवास, एसी कोचद्वारे स्थानिक पर्यटन, जेवण सर्व प्रवेश शुल्क व प्रवास विमा याचा समावेश आहे. इच्छुक प्रवासी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर बुकिंग करू शकतात.