‘महावतार नरसिंह’ची बॉक्स ऑफिसवर कृपा

अलीकडेच प्रदर्शित ‘महावतार नरसिंह’ची बॉक्स ऑफिसवर कृपा दिसून येतेय. रक्षाबंधनच्या सुट्टीत ‘महावतार नरसिंह’ने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. हा ऑनिमेटेड चित्रपट 25 जुलै रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने पहिल्या दिवशी 1 कोटी 75 लाख रुपये कमावले होते. रिलीजच्या पहिल्या आठवडय़ात एपूण 44 कोटी 75 लाख रुपये कमावले. दुसऱ्या आठवडय़ात ‘महावतार नरसिंह’च्या कमाईत मोठी वाढ झाली. ‘महावतार नरसिंह’चे एपूण कलेक्शन आता 145 कोटी 15 लाख रुपये झाले. चित्रपटाने भल्याभल्याना मागे टाकले आहे.