
इंटरनेटवर सिंह आणि मगरीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. यामध्ये सिंहांची एक मोठी फौज मगरीवर हल्ला करते, पण पुढे बाजी पलटते. असा काही थरार घडतो की, बघणारे थक्क होतात. सुरुवातीला सिंहांच्या टोळीला विजय जवळ वाटतो, पण पुढच्याच क्षणी अशी बाजी पलटते की, ‘जंगलाचा राजा’ही दोन पावले मागे सरकतो. व्हिडीओमध्ये दिसते की, एक खूप मोठी मगर हलक्या पाण्यात आडवी होऊन निवांतपणे पडलेली असती. तेवढय़ात तिच्यासमोर एक सिंह येतो. सुरुवातीला मगर सावधपणे बचाव करते, पण सिंहही मागे हटत नाही. काही वेळातच इतर सिंहही मैदानात उतरतात. एक क्षण असा येतो की, पाहणाऱयांना वाटतं आता मगर संपणार, पण इथेच ट्विस्ट येतो. मगर अचानक जबरदस्त ताकदीने पलटवार करते. आपल्या प्रचंड जबडय़ांच्या जोरावर ती सिंहांना मागे हटायला भाग पाडते. मगर त्यांना पाण्यापासून दूर हुसकावून लावते.