राज्यातील 49 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदके जाहीर

हिंदुस्थानच्या स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपतींकडून शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेचे पदक व गुणवत्तापूर्ण सेवेचे पदके जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील 49 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील पुढील 49 पोलीस अधिकारी व अमलदार यांना राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली आहेत.

शौर्य पदके जाहीर झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार

नेताजी बंडगर, तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, मनोहर पेंडाम (पोलीस हवालदार), प्रकाश कन्नाके (पोलीस शिपाई), अतुल येगोलपवार (पोलीस शिपाई), हिदायत सद्दल्ला खान (पोलीस शिपाई), सुरेश  तेलामी (मरणोत्तर) पोलीस शिपाई.

उल्लेखनीय सेवेचे पदक

अनिल पुंभारे (सहपोलीस आयुक्त, वाहतूक, मुंबई शहर), नवीनचंद्र दत्ता रेड्डी (सहपोलीस आयुक्त, नागपूर शहर), राजेंद्रसिंग प्रभुसिंग गौर (उपविभागीय पोलीस अधिकारी, पुणे ग्रामीण).

गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक 

प्रमोदकुमार शेवाळे (पोलीस उपमहानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई), रमेश विठेकर (सहाय्यक समादेशक), शैलेंद्र धिवर (सहाय्यक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई), ज्योती देसाई (सहाय्यक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई), राजन माने (सहाय्यक पोलीस आयुक्त, सोलापूर शहर), सुरेश कराळे (सहाय्यक समादेशक), दत्तात्रय ढोले (सहाय्यक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई), नरेंद्र हिवरे (सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर), पैलास  पुंडकर (सहाय्यक पोलीस आयुक्त, अमरावती शहर), बाळासाहेब भालचिम (उपविभागीय पोलीस अधिकारी), संजय चांदखेडे – पोलीस उपअधीक्षक, रवींद्र वाणी – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंचल मुदगल – पोलीस निरीक्षक, विश्वास पाटील – पोलीस निरीक्षक, सत्यवान  म्हशाळकर –  पोलीस निरीक्षक ओव्हरसिंग पटले – पोलीस निरीक्षक, सतीश जाधव – पोलीस निरीक्षक, दीपककुमार वाघमारे – उपविभागीय पोलीस अधिकारी, जोसेफ डिसिल्व्हा, वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी,  सुनील चौधरी – उपनिरीक्षक, आनंदराव पवार – उपनिरीक्षक, अनिल  ब्राम्हणकर – उपनिरीक्षक, सुभाष हांडगे – उपनिरीक्षक,  संदीप शिंदे – उपनिरीक्षक, संदीप मोरे – उपनिरीक्षक, काशिनाथ राऊळ – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, अशोक जगताप – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, दीपक परदेशी – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रमेश ताजणे – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश नावरे – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, अनंत व्यवहारे – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, धोंडिबा भुट्टे- सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हर्षकांत पवार – श्रेणी उप निरीक्षक, प्रमोद पवार – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,  राजेंद्र मोरे – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,  जितेंद्र काsंडे- सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, संजय शिरसाट – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, संजीवकुमार माथूर – हवालदार, रमेश कुंभलकर – हवालदार