Photo – ‘कोस्टल रोड’ वरील जॉगिंग ट्रॅक मुंबईकरांसाठी खुला

Photo - रुपेश जाधव

मुंबई महानगरपालिकेने बांधलेला आणि मुंबईला वेगवान बनवणारा कोस्टल रोडवर 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 24 तास वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

(सर्व फोटो – रुपेश जाधव)

या मार्गावरील 5.25 किमी लांबीची मोकळी जागा उपलब्ध झाली असून या ठिकाणी मुंबईकरांना बिनधास्त फिरता येणार आहे.

पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या आणि दक्षिण मुंबईचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टलमधील अद्ययावत सुविधांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण करण्यात आले.

लोकार्पण झालेले जॉगिंग ट्रॅक आणि पादचारी भुयारी मार्ग हे नागरिकांसाठी 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4.30 वाजेपासून खुले करण्यात आले आहेत.

नागरिकांसाठी विरंगुळा तसेच शारीरिक तंदुरुस्तीसाठी पालिकेने जॉगिंग ट्रॅकवर विविध सोयीसुविधा दिल्या आहेत.

जॉगिंग ट्रॅकवर सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे.

ठिकठिकाणी हिरवळ विकसित करण्यात आली असून विविध फुलझाडे, शोभेची झाडे, याजॉगिंग ट्रॅककडे जाण्यासाठी उभारलेल्या भुयारी पादचारी मार्गावर दिव्यांगांसाठी स्वतंत्र रॅम्प तयार करण्यात आला आहे.