भटक्या कुत्र्यांच्या संख्येत हिंदुस्थान चौथाच अमेरिका पहिल्या, ब्राझील दुसऱ्या तर, चीन तिसऱ्या स्थानावर

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर संपूर्ण देशभरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांची समस्या केवळ हिंदुस्थानात नव्हे, तर जगभरात आहे. भटक्या कुत्र्यांच्या संख्येच्या यादीत हिंदुस्थान देश चौथ्या क्रमांकावर आहे. पहिल्या स्थानावर संयुक्त राज्य अमेरिका आहे. तर दुसऱ्या स्थानावर ब्राझील आणि तिसऱ्या स्थानावर चीन देश आहे. अमेरिकेत 75.8 मिलियन भटके कुत्रे आहेत. ब्राझीलमध्ये 3.57 कोटी कुत्रे आहेत. चीनमध्ये 2.74 कोटी कुत्रे असून बीझिंगसारख्या शहरात आधी पाळीव कुत्र्यांवर बंदी होती. परंतु आता ती उठवण्यात आली आहे. हिंदुस्थानात 1.53 कोटी भटके कुत्रे आहेत. रशियात 1.5 कोटी कुत्रे असून कुत्र्यांना फिरवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मेट्रो डॉगसुद्धा आहेत. रशियात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. जपानमध्ये 1.2 कोटी कुत्रे आहेत. कुत्र्यांना पाळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पाळीव कुत्र्यांचा उद्योग 10 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. फिलिपिन्समध्ये 1.16 कोटी कुत्रे आहेत. अर्जेंटिना 92 लाख, फ्रान्समध्ये 74 लाख आणि रोमानियात 41 लाख कुत्रे आहेत.