
गुगलने पिक्सेल 10 सीरिज हिंदुस्थानात लाँच केली. ‘मेड बाय गूगल’ या वार्षिक कार्यक्रमात पिक्सेल 10, पिक्सेल 10 प्रो, पिक्सेल 10 प्रो एक्सएल आणि पिक्सेल 10 प्रो फोल्ड हे फोन लाँच केले. व्हेरिएबल डिव्हाइसेसमध्ये पिक्सेल वॉच 4, बड्स 2ए आणि बड्स प्रो 2 देखील आणले आहेत. गुगल पिक्सेल 10 सीरिजच्या बेस मॉडेल फोनची किंमत 79,999 रुपये आहे, तर पिक्सेल 10 प्रो एक्सएलची किंमत 1 लाख 24 हजार 999 रुपये आहे. गुगलच्या पिक्सेल 10 प्रो फोल्डच्या फोनची किंमत 1 लाख 72 हजार 999 रुपये आहे.