मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना झेड सुरक्षा

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यांना झेड सुरक्षा दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत 22 ते 25 सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सशस्त्र जवान 24 तास तैनात असणार आहेत. तर त्यांच्या शासकीय निवासस्थानी निमलष्करी दलाचा व्हीआयपी सुरक्षा गट तैनात असणार आहे. हा गट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार प्रियंका वढेरा यांच्या सुरक्षेतही तैनात आहे.