
इंग्लंडविरुद्ध दमदार पुनरागमनाचे स्वप्न पाहणाऱ्या करुण नायरच्या वाटेत अडथळा आला आहे. 34 वर्षीय नायर फिटनेस टेस्टमध्ये नापास ठरल्यानंतर त्याला पुनर्वसन प्रक्रियेतच राहावे लागणार आहे. त्यामुळे त्याला स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झालेय. बीसीसीआयने त्याला केएससीए महाराजा टी–20 ट्रॉफीत खेळण्यास मज्जाव केला आहे. तो म्हैसूर वॉरियर्सकडून खेळण्यासाठी संघासोबत म्हैसूरला पोहोचला होता, मात्र बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्सकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळेपर्यंत त्याला मैदानात उतरणे शक्य होणार नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बोटाला झालेली दुखापत अजूनही त्याला त्रास देत आहे.