पुण्यात विसर्जन मिरवणुका नेहमीच्या क्रमानेच

गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा असलेल्या पुणे शहरात बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळेवरून सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मध्यस्थीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि मंडई गणपती मंडळाने पोलिसांच्या विनंतीला मान दिला आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणेच यंदाही दोन्ही मंडळे आपआपल्या प्रथेनुसार मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. गणपती विसर्जन मिरवणुकीच्या वेळेमुळे अनेक मंडळांमध्ये शाब्दिक शीतयुद्ध रंगले असून अमुक-तमुक वेळेत आम्ही रांगेत शिरणार अशा प्रकारे बोलले जात होते. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीच्या शिस्तीला बाधा निर्माण होणार होती. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला आहे.