Chandrapur News – जंगलात गेलेल्या बाप-लेकावर अस्वलाचा हल्ला, वडिलांची प्रकृती चिंताजनक

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अस्वलाने बाप-लेकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अस्वलाच्या या भयंकर हल्ल्यात मुलगा आणि त्याचे वडील गंभीर जखमी आले असून त्याना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील जुनोना जंगल परिसरात अरुण कुपसे आणि त्यांचा मुलगा विजय कुपसे कुड्याचे पान तोडण्यासाठी गेले होते. याच दरम्यान अस्वलाने दोघांवर हल्ला केला. यावेळी इतर गावकऱ्यांनी अस्वलाला दगडी आणि काठ्यांनी मारत पळवून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु अस्वलावर त्याचा फार काही परिणाम झाला नाही. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. उपस्थित गावकऱ्यांनी दोघांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालायत दाखल केलं. या हल्ल्यात अरुण कापसे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी नागपूर मेडिकल कॉलेजला रवाना केलं आहे.