
हिंदुस्थानने पाकिस्तानी विमानांना हिंदुस्थानी क्षेत्रातून जाण्यासाठी 24 सप्टेंबरपर्यंत बंदी घातली आहे. पाकिस्तानने हिंदुस्थानी विमानांना पाकिस्तानातील हवाई क्षेत्रातून जाण्यावर 24 सप्टेंबरपर्यंत बंदी घातल्यानंतर हिंदुस्थानने हा निर्णय घेतला आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी हवाई क्षेत्राला बंद ठेवण्याचा कालावधी वेगवेगळ्या नोटिस टू एअरमेन जारी केले आहेत.
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने 30 एप्रिलपासून पाकिस्तानच्या विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. हे पाऊल पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी उचलण्यात आले होते. सुरुवातीला हवाई क्षेत्र 24 मेपर्यंत बंद करण्यात आले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने याला वाढवण्यात आले. आता 24 सप्टेंबरपर्यंत याला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही बंदी नोटिस टू एअरमेन नुसार, पाकिस्तानी विमाने, पाकिस्तानी एअरलाईन, किंवा पाकिस्तानने भाड्यांवर घेतलेल्या सर्व विमान आणि सैन्य उड्डाणांवर हे नियम लागू होतील.