
अमेरिकेचे उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्टार लिंकची इंटरनेट सेवा लवकरच हिंदुस्थानात मिळणार आहे. स्टार लिंक कंपनीने यूआयडीएआयसोबत भागीदारी केली आहे. ज्या ग्राहकांना स्टार लिंकची इंटरनेट सेवा घ्यायची आहे त्यांच्या आधारकार्डची पडताळणी करण्यात येईल. या भागीदारीअंतर्गत, स्टार लिंक त्यांच्या युजर्संची पडताळणी करण्यासाठी आधार-आधारित प्रमाणीकरणाचा वापर करेल. ही प्रक्रिया स्टार लिंकसाठी ग्राहक पडताळणी जलद, सुरक्षित आणि सोपी करेल. यामुळे केवायसी नियमांचे पालन करणेदेखील सोपे होईल.