
कराच्या माध्यमातून सरकारला मोठा महसूल मिळतो. ताज्या आकडेवारीनुसार, देशातील काही राज्ये कर संकलनात सर्वात पुढे आहेत. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामीळनाडू, उत्तर प्रदेश ही सर्वाधिक कर वसुली करणारी टॉपची पाच राज्ये आहेत. जीएसटी संकलनात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये महाराष्ट्रातून 3.8 लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले, तर एप्रिल 2025 मध्ये हा आकडा 41645 कोटी रुपये झाला. गुजरातने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 1.74 लाख कोटी रुपये जीएसटी संकलन केले. गुजरातला एप्रिल 2025 मध्ये 14970 कोटी रुपये जीएसटीतून मिळाले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी कौन्सिलची 56 वी बैठक 3 ते 4 सप्टेंबरदरम्यान दिल्लीत होणार आहे. या बैठकीत जीएसटी स्लॅब कमी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. 12 टक्के आणि 28 टक्के जीएसटी स्लॅब रद्द करण्यास मान्यता दिली जाऊ शकते. यापुढे आता केवळ पाच टक्के आणि 28 टक्के असे दोन स्लॅब राहतील. याआधी 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के असे चार जीएसटी स्लॅब आहेत.