
चिप बनवणारी कंपनी इंटेलने अमेरिकेत तब्बल 8.9 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकन सरकार आणि इंटेल कंपनी यांच्यात नुकताच एक करार झाला असून अमेरिकन सरकारने चिप निर्माता कंपनी इंटेलमध्ये जवळपास 10 टक्के भागीदारी घेतली आहे. याअंतर्गत या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इंटेलने संयुक्तपणे ही घोषणा केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी याला ग्रेट डील असे म्हटले आहे.
इंटेलने 2025 मध्ये तब्बल 25 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याची घोषणा कंपनीचे नवीन सीईओ लिब बू टॅन यांनी दिली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या कराराची घोषणा टथ या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून केली. यावेळी पोस्टमध्ये म्हटले की, मला हे सांगताना अभिमान वाटत आहे की, संयुक्त राज्य अमेरिका आता इंटेलची 10 टक्के हिस्सेदारी घेतली आहे. ही एक महान अमेरिकन कंपनी आहे. या कंपनीचे भविष्यही शानदार आहे, असे ट्रम्प म्हणाले. इंटेलचे सीईओ लिप बू टॅन यांच्यासोबत खासगीत चर्चा केल्यानंतर या सौद्यात टॅक्सपेयर्सचा कोणताही खर्च आला नाही. अमेरिकेने या शेअर्ससाठी कोणतेही पैसे मोजले नाही. परंतु, आता या शेअर्सचे मूल्य जवळपास 11 अब्ज डॉलर आहे. हे अमेरिकेसाठी आणि इंटेलसाठी एक मोठा सौदा आहे.
अमेरिका सरकारला 1.9 अब्ज डॉलरचा लाभ
अमेरिकी सरकारला ही भागीदारी आधीच जारी करण्यात आलेल्या 11.1 अब्ज डॉलरचा फंड आणि गहाण ठेवलेल्या शेअर्सला ट्रान्सफर द्वारे मिळतेय. ट्रम्प सरकारला एकूण 433.3 मिलियन विना-वोटिंग शेअर्स मिळाले आहेत. या शेअर्सची किंमत 20.47 डॉलर प्रति शेअर आहे. अमेरिकी सरकारला आधीच 1.9 अब्ज डॉलरचा लाभ झालेला आहे.
25 हजार नोकऱ्या जाणार
अमेरिकी सरकार आता इंटेलची सर्वात मोठी शेअरधारकांपैकी एक बनले आहेत. तर सांता क्लारा, कॅलिफोर्निया येथील इंटेल कंपनी 2025 या वर्षात जवळपास 25 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून
काढून टाकणार आहे.